We sincerely thank Krunal Kshirsagar for this translation! (Twitter, Github) Click here for English.


समाजाला होणार्‍या आर्थिक आणि साथीच्या दोन्ही धोक्यांना कमी करण्यास मदत करण्यासाठी बरेच COVID-19 अ‍ॅप्स जगभरात वेगाने विकसित केले जात आहेत.

ह्या काळात तयार केलेले टेक सोल्यूशन्सने डेटा गोपनीयता नियमांचे पालन करणे अगदी महत्त्वाचे आहे जेणेकरून जनतेला भविष्यात उद्-भवणाऱ्या शोषणांना सामोरं जाव लागणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वपूर्ण आहे. अ‍ॅप डेव्हलपमेंटची प्रतिभा तुलनेने सामान्य आहे, गोपनीयता कौशल्य सामान्य नाही म्हणून डेटा गोपनीयता विचारांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.

ह्या अनुप्रयोगांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता गोपनीयता ही एक महत्वाची गुरुकिल्ली आहे - उदाहरणार्थ, कॉनटॅक्ट ट्रॅकिंग अ‍ॅप्स हे प्रभावीपणे वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. गोपनीयता हे केवळ मानवी हक्कच नाही तर गोपनीयता विश्वासही जोपासते आणि म्हणूनच या COVID-19 अ‍ॅप्लिकेशन्सनी गोपनीयतेचे पालन करणे देखील आवश्यक आहे.

ओपनमाइंड हा 7,300+ अभियंता, संशोधक, लेखक आणि विकसकांचा एक समुदाय आहे ज्यामध्ये मुक्त-स्त्रोत (ओपन-सोर्स) कोड आणि विनामूल्य शिक्षणाद्वारे खासगी एआय (AI) तंत्रज्ञानात प्रवेश करण्यासाठी होणाऱ्या अडथळांना कमी करण्यास समर्पित आहे.

आमचे कौशल्य, मुक्त-स्त्रोत (ओपन-सोर्स) कोड, शैक्षणिक साहित्य आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा पुरवून, आम्ही जगभरातील COVID-19 अ‍ॅप विकसकांना त्यांच्या संभाव्य वापरकर्त्याच्या बेसची गोपनीयता संरक्षित करण्यावेळी त्यांच्या अ‍ॅप्सची प्रभावीता वाढविण्यासाठी सक्षम करू शकतो.


गेल्या कित्येक आठवड्यांमध्ये आपण जगभरातील COVID-19 चा प्रसार कमी करण्यासाठी डेटा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबर मोबाइल आणि वेब अ‍ॅप्सची वेगवान निर्मिती पाहिली आहे. एकत्रित उद्दीष्ट ह्या रोगाचा फैलाव कमीत कमी करणे आणि त्याचे आर्थिक प्रभाव एकाच वेळी कमी करणे हे आहे. लोकेशन व स्थान-ट्रॅकिंग अ‍ॅप्सने या जलद-तंत्रज्ञानाच्या निराकरणामुळे जगातील बर्‍याच लोकसंख्येची गोपनीयता कायमस्वरुपी झिजणार, याची मोठी चिंता उघडकीस आणली आहे.

आता हे स्पष्ट झाले आहे की COVID-19 पासून होणारे नुकसान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना दीर्घकालासाठी चालू असतील. या काळात वेगाने तयार करण्यात आलेले टेक सोल्यूशन्सने डेटा गोपनीयता नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे जेणेकरून जनतेला भविष्यात उद्-भवणाऱ्या शोषणांना सामोरं जाव लागणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वपूर्ण आहे. ह्या आवश्यकतेच्या अनुषंगाने, COVID-19 साथीच्या रोगावर प्रतिसाद देताना टेक समुदायाला मदत करण्यासाठी ओपनमाइंड विनामूल्य कोड आणि शिक्षण प्रदान करीत आहे.

अ‍ॅप डेवलपमेंटची प्रतिभा भरपूर प्रमाणात आहे आणि बरेच विकसक(डेवलपर्स) स्केलेबल, स्थान आधारित विश्लेषण करून  COVID-19 चा प्रसार कमी करण्यासाठी सक्षम आहेत, परंतु गोपनीयता संरक्षणाच्या मार्गाने करणाऱ्या प्रतिभेचा स्रोत मिळवणे अधिक कठीण आहे.

ओपनमाइंड आपले कौशल्य, मुक्त स्रोत(ओपन-सोर्स) कोड, शैक्षणिक साहित्य आणि लॉजिस्टिकल पायाभूत सुविधा पुरवत आहे जेणेकरून आम्ही COVID-19 अ‍ॅप विकसकांना त्यांच्या संभाव्य वापरकर्त्यांच्या बेसची गोपनीयता संरक्षित करत त्यांच्या अ‍ॅप्सची प्रभावीता अधिकतम करण्यास सक्षम करू पाहते.

ओपनमाइंड विशेषतः यावर कार्य करीत आहे:

  • आवश्यक गोपनीयता संरक्षित तंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी विनामूल्य, मुक्त स्रोत(ओपन-सोर्स) कोड प्रदान करणे. शक्य तितक्या जास्त आवश्यकता देण्यासाठी, कोड बेसमध्ये वैयक्तिक घटक आणि व्हाईट-लेबल(white-label) दोन्ही अनुप्रयोग समाविष्ट आहेत.
  • सर्व अ‍ॅप्सनिर्माते आणि त्यांच्या स्थानिक कार्यक्षेत्राच्या वतीने अ‍ॅप्सची तपासणी करण्यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांना हे अ‍ॅप्स कसे तयार करावेत व ते कसे असावेत आणि त्याद्वारे नागरिकांचा डेटा आणि त्यामधील खाजगी माहिती यांचे संरक्षण कसे करावे याविषयी शिक्षण प्रदान करू.

या अ‍ॅप्सची तातडीने गरज आहे. तर गोपनीयतेची आत्ता काळजी का करावी?


स्वातंत्र्य आणि मूलभूत मानवाधिकारांचे संरक्षण याशिवाय, COVID-19 अ‍ॅप बिल्डर्सना आत्ता गोपनीयतेची आवश्यक काळजी घेण्याची दोन कारणे आहेतः

पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकशाहीमध्ये या अ‍ॅप्सची यशस्वीपणे उपयोग करण्याकरिता वापरकर्ता अनुपालन (user compliance) हे एक मुख्य आव्हान असेल. उदाहरणार्थ; कॉनटॅक्ट-ट्रेसिंग अ‍ॅप्स खरोखर प्रभावी होण्यासाठी वापरकरणाऱ्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आम्ही या अ‍ॅप्सचे यश भिन्न राजकीय संरचना असलेल्या राष्ट्रांमध्ये पाहिले आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सरकार आणि गोपनीयतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन राष्ट्रांमध्ये वेगळा असतो. डेटा हाताळणीची हमी, जसे की 'हा अ‍ॅप कधीही आपला डेटा क्लाऊडवर अपलोड करत नाही', मोठ्या प्रमाणात विश्वास वाढवण्यास मदत करतो - आणि म्हणूनच, व्यक्तींकडून  — अनुपालन. गोपनीयता संरक्षित प्रणाली ही प्रभावी प्रणाली आहेत.

पुढे एक त्वरित आव्हान आहेः जर गोपनीयता राखली गेली नसेल आणि थोड्या वेळेतच पायाभूत सुविधा तयार करुन मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा एका सार्वजनिक ठिकाणी ठेवला गेला तर यामुळे सुरक्षा तज्ञ त्याला "हनी पॉट" म्हणतात - एक प्रचंड डेटासेट शोषणासाठी योग्य. हे अचूकपणे समजणे महत्वाचे आहे की उत्तम प्रकारे सुरक्षित सॉफ्टवेअर असे काही नसते, विशेषत: जेव्हा ते तयार केले जाते आणि वेगवान अंतिम मुदतीच्या अंतर्गत तैनात केले जाते (जसे की साथीच्या रोगराई दरम्यान). अशाप्रकारे, कमी वैयक्तिक डेटा एकत्रित करणे बरेच चांगले आहे - खासकरुन जेव्हा आपण मोठ्या संख्येने लोकांसाठी तैनात केले जाणारे अ‍ॅप्स वेगवान बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा.

शिवाय, ही जागतिक महामारी म्हणून; शेकडो स्वतंत्र संस्था, देश आणि राज्ये त्यांच्या COVID-19 अ‍ॅप्सची स्वतःची आवृत्ती अंमलात आणतील आणि मंजूर करतील. ही एक चांगली गोष्ट आहे - अ‍ॅप विविधता जोखीममध्ये विविधता आणून आणि तडजोड झालेल्या कोणत्याही एका सिस्टमसाठी मिळणारं बक्षीस कमी करून सुरक्षिततेत सुधारणा करेल. या अ‍ॅप्सवर गोपनीयता संरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करून आपण डेटा सुरक्षितता सुनिश्चित करताना डेटा केंद्रीकरण आणि एकत्रित करण्याचे फायदे जपू शकतो आणि त्यातून वैयक्तिक स्वातंत्र्य राखून ठेवले जाते.

ठीक आहे, मी आत्ताच एक COVID-19 अ‍ॅप विकसित करीत आहे. ओपनमाइंड माझ्यासाठी कोणते साधने उपलब्ध करून देईल?

बरेचशे COVID-19 अ‍ॅप जे हल्ली विकासीत होत आहेत ते 3 प्रकारचे डेटा स्रोत वापरतात. परिपूर्ण स्थान (जीपीएस कोऑर्डिनेट्स), सापेक्ष स्थान (आपण कोणाच्या जवळपास आहोत) आणि लोक एका विशिष्ट गटाचे सदस्य आहेत की नाही याची पडताळणी करणे - ते गट वयाचे असू शकतात, त्यांची चाचणी घेण्यात आली आहे की नाही, इत्यादी.

आम्ही ओपनमाइंड म्हणून काय शोधत आहोत:

  • हा डेटा जिथे मिळविला जाऊ शकतो त्या विविध क्षेत्रात प्रदर्शित करू आणि योग्य संमतीने हा डेटा मिळविण्यासाठी विकसकांना मूलभूत सुविधा देऊ जेणेकरून वापरकर्तांचा विश्वास वाढेल आणि त्यांची मान्यता प्राप्त करून अ‍ॅप्स शक्य तितके प्रभावी होऊ शकतील.
  • विकसक त्यांच्या अ‍ॅप्सचा विकास करण्यासाठी या 3 प्रकारच्या डेटाचा कसा फायदा घेऊ शकतात अशा प्रकारे दर्शवा ज्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांची गोपनीयता जपली जाईल. पुन्हा, अ‍ॅपमधील विश्वास आणि अनुपालन जास्तीत जास्त करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे, जे या अ‍ॅप्सच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच हे सुनिश्चित करते की अ‍ॅप एकाच वेळी सर्वात प्रभावी अ‍ॅप देखील आहे तर सर्वात गोपनीयता संरक्षित करणारा अनुप्रयोग देखील आहे.

शिवाय, आमचा मुक्त-स्त्रोत (ओपन-सोर्स) कोड प्रदान करून आम्ही विकसकांना दोन पट मदत करतो:

  • विकसक आता त्यांच्या अनुप्रयोगांमध्ये गोपनीयता-संरक्षणाची तंत्रे सहजतेने समाकलित करू शकतात - जे यापूर्वी गैर-तज्ञांच्या हाताचे खेळ नव्हते व ते त्यांच्या वेळेच्या आवाक्याबाहेर होते.
  • याव्यतिरिक्त, विकासकांना दोन्ही घटक आणि पूर्ण अनुप्रयोगांच्या स्वतःच स्त्रोत(सोर्स) कोडमध्ये प्रवेश आहे. हे त्यांच्या संस्थेद्वारे, देश आणि राज्याद्वारे मागणीनुसार वैद्यकीय, कायदेशीर आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी कोड अनुरूप बनविण्यास अनुमती देते. विकसक लॉक केलेले नाहीत. कार्यसंघ आणि संस्था यांचे स्वत: चे तंत्र निराकरण करण्यासाठी वैयक्तिक घटक आणि संपूर्ण व्हाईट-लेबल (white-label) अनुप्रयोग दोन्ही प्रदान करून आम्ही त्यांना गोपनीयता करू नयेत अशा आवश्यक गोपनीयता-संरक्षित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सक्षम बनवू जे अन्यथा ते काम करण्यास सक्षम होऊ शकणार नव्हते.

यावर जोर देण्यासाठी, एक परिभाषित अ‍ॅप आणि एक परिभाषित अ‍ॅपसाठी मूलभूत सुविधा तयार करणे हे ओपनमाईंडचे लक्ष्य नाही. त्याऐवजी प्रवेशातील अडथळा कमी करणे हे आमचे लक्ष्य आहे जेणेकरून जगभरातील सर्व अ‍ॅप विकसकांना शक्य तितक्या वेगाने तयार करण्यासाठी योग्य ज्ञान आणि साधनांसह सक्षम केले जाईल आणि केवळ शक्य तितक्या वेगाने तयार करणे नव्हे तर रोग आणि नुकसानीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शक्य तितक्या प्रभावी देखील असणे.

छान - मी कोठे सुरू करू?

विकसकांसाठी:

अ‍ॅप्सना मान्यता / नामंजूर करणार्‍या सरकारी अधिकाऱ्यांसाठी:

मदतीसाठी शोधत असलेल्या गोपनीयता आणि सुरक्षा तज्ञांसाठीः

देणगीदारांसाठी:

आपल्याला वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.

जर वेळ हा घटक नसता तर ओपनमाईनड आपल्या व्यापक स्वयंसेवक समुदायाचा वापर करून सामान्य लोकांपर्यंत या सेवा पोहोचविण्यासाठी उत्कृष्ट स्थितीत असता. ओपनमाइंड हा 7,300+ अभियंता, संशोधक, विपणक आणि हॅकर्सचा समुदाय आहे जे  मुक्त-स्त्रोत(ओपन-सोर्स)कोड आणि विनामूल्य शिक्षणाद्वारे खाजगी एआय(AI) तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्यासाठी अडथळा कमी करण्यासाठी समर्पित आहेत. आमच्याकडे सध्या 8 विकास कार्यसंघ, 6 समुदाय कार्यसंघ आणि 2 सनशोधन पथके आहेत आणि दर आठवड्याला 100+ लोकांची मीटिंग.

तथापि, आमचे अभियंते बहुतेक स्वयंसेवक त्यांच्या प्रकल्पांवर मर्यादित तास काम करतात. या स्वयंसेवकांमध्येही, बरेच लोक त्यांच्या स्वत: च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात (नोकरी गमावणे, कार्यक्षेत्र गमावणे, अतिरिक्त कौटुंबिक ओझे इत्यादी) महत्त्वपूर्ण विस्थापन अनुभवत आहेत. बरेच लोक ज्यांना मदत करायची आहे ते करू शकत नाहीत आणि जे केवळ मर्यादित चक्रांद्वारेच हे करू शकतात.

याव्यतिरिक्त, वर्तमान महामारी कधी बंद होईल हे कोणालाही माहिती नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध लसीसाठी अंदाजे 18 ते 21 महिने आहेत. समाज केव्हां सामान्य आयुष्याकडे परत येईल याविषयीचा अंदाजदेखील लावला जाऊ शकत नाही. आमचा विश्वास आहे की वेगवान गतिमान आणि कठोर-प्रगतीशील विकास आणि 6 महिने शैक्षणिक प्रयत्नांचा जगभरातील कोविड डेटा आणि अनुप्रयोगांच्या पायाभूत सुविधांवर गहन प्रभाव पडू शकतो.

आम्ही विचार करत आहोत की आमचे डेवलपमेंट (कोडिंग) आणि शिक्षण (लेखन) समुदायांना पूर्ण कालावधी आणि अर्धवेळ कालावधी (6 महिने) पर्यंत श्रेणीसुधारित करण्याची इच्छा आहे. आमच्या सदस्यांच्या जीवनात स्थिरता देऊन, आम्ही शक्य तितक्या वेगवान मार्गाने कोड संसाधने आणि शैक्षणिक साहित्य (संसाधनांचा कसा वापर करावा यासाठी) देण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित करू इछित्तो.

आपल्याकडे आमच्या कोडेबेसमध्ये योगदान देण्यास वेळ नसल्यास, परंतु अद्याप समर्थन देणे आवडत असल्यास, आपण आमच्या मुक्त संग्रहात बॅकर बनू शकता. सर्व देणग्या आपल्या जगाला अधिक गोपनीयता संरक्षित करण्याच्या महत्त्वाच्या मोहिमेमध्ये आमच्या समुदायाचे समर्थन देण्याच्या दिशेने जातात जे या संकटाच्या काळात महत्त्वपूर्ण आहे!

ओपनमाइंडच्या मुक्त संकलित पृष्ठाद्वारे देणगी देऊ शक्ता.